कोल्हापूर महानगरपालिकेचा आंधळा कारभार समोर ; तिरंगा रंगात लायटिंग लावली उलटी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तसंच हर घर तिरंगा अभियान अंतर्गत महापालिकेच्या इमारतीवर तिरंगा रंगात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ही रोषणाई उलटी लावल्याने मनपाचा आंधळा कारभार समोर आला. मनपाच्या या कारभारावर सोशल मीडियावर कोल्हापूर महापालिकेला चांगलच ट्रोल केलं जात आहे.

मनपाच्या इमारतीवर वरती हिरवा रंग आणि खाली केशरी रंग अशी चुकीची विद्युत रोषणाई करण्यात आली होती.ही चूक लक्षात आल्यावर रोषणाई बंद करण्यात आली. यावर महानगरपालिकेला विचारलं असता विद्युत रोषणाईबाबत ट्रायल सुरु असल्याच सांगितलं आहे.

error: Content is protected !!