वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करणारे शिवसेनचे रामदास कदम यांचा वैभववाडी भाजपाच्यावतीने जोरदार निषेध करण्यात आला. भाजपा तालुका कार्यालय ते संभाजी चौक दरम्यान निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, बंड्या मांजरेकर,सज्जन काका रावराणे, नेहा माईंणकर, प्राची तावडे संजय सावंत, विवेक रावराणे, संतोष पवार, शिवाजी राणे, उत्तम सुतार, दाजी पाटणकर अवधूत नारकर यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.














