वैभववाडी (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यामंदिर मांगवली नंबर एक या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने ग्रामस्थांना मंत्र मुग्ध झाले. यावेळी बालकलाकाराने विविध वेशभूषा करीत देशभक्तीपर गीते नृत्याच्या तालावर सादर केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
मांगवली नं 1 या शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावचे सरपंच नाटेकर माजी सरपंच महेश संसारे शरद कांबळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आत्माराम जावडेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महेश संसारे याने स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मोहन कांबळे संजय पाटील राहुल नांदुरकर संजय नारकर यांनी विशेष मेहनत घेतली.