चौके प्राथमिक शाळा नंबर एक येथे शालेय मुलांचा गुणगौरव

पत्रकार संतोष गावडे यांचा आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रम

चौके (अमोल गोसावी) : जिल्हा परिषद शाळा चौके नंबर 1 येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामाजिक कार्यकर्ते तसेच मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष पत्रकार संतोष गावडे आणि परिवार यांच्याकडून आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ इयत्ता पहिली ते चौथी या वर्गातील प्रथम तीन क्रमांक येणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात शैक्षणिक साहित्य देत मुलांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी पत्रकार संतोष गावडे त्यांची पत्नी सिद्धाली गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन गावडे, मुख्याध्यापिका भाग्यश्री कुनुरे, शिक्षिका मनीषा डाके, शिक्षिका चौकेकर,पालक, विध्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!