ओझर विद्यामंदिर येथे 22 ऑगस्ट पासून तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

मसुरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक कल्याण संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तसेच मालवण तालुका क्रीडा समिती यांच्यावतीने मालवण तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन 22 ते 24 ऑगस्ट या कालावधीत मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगावच्या भव्य पटांगणावर करण्यात आले आहे. दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वा.पासून 14 वर्षे मुले मुली, दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. पासून 17 वर्षे मुले मुली व दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. पासून 19 वर्षे मुले – मुली याप्रमाणे सामने होणार आहेत. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक श्री डी डी जाधव यांनी केले आहे.

error: Content is protected !!