कणकवली (प्रतिनिधी) : नौसेना दिनाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आम्ही सुरुवातीपासून सांगितले आहे.सव्वा दोन कोटी च्या हेलिपॅड चा फक्त पंतप्रधान यांनी केला. एकूण 11 हेलिपॅड बांधली गेली. यासाठी सव्वा दोन कोटींचा खर्च केला. रस्ते आणि राजकोट किल्ला सुशोभीकरण साठी 3 कोटी खर्च पिडब्लूडी ने केला. आणि शिवाजी महाराज पुतळ्यासाठी एकूण 7 कोटी 50 लाख खर्च केला. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी 21 निव्हेंबर 23 रोजी 5 कोटी 54 लाख हेलिकॉप्टर इंधन साठी 37 लाख, मान्यवर व्यवस्था निवास भोजन 25 लाख, मंडप व्यवस्था 2 कोटी, बॅरिकेट दीड कोटी, इंटरनेट पाणीपुरवठा व अन्य खर्च 18 लाख 50 हजार, जिल्ह्याबाहेरून आलेल्या सुरक्षा व्यवस्थे साठी 5 कोटी 54 लाख ची मागणी केली. या मागणीला 4 डिसेंबर 2023 रोजी मान्यता अप्पर सचिव नियोजन महाराष्ट्र राज्य यांनी दिली.म्हणजेच खर्च मान्यतेपुर्वी खर्च केला गेला. काही अधिकाऱ्यांनी निवास भोजन व्यवस्था पसंत न पडल्याने स्वखर्चाने स्वतःची व्यवस्था केली होती. थोडक्यात नौसेना दिनी वायफळ खर्च पिडब्लूडी ने केला आहे. राज्य सरकार ने नौसेना दिनासाठी एकूण 13 कोटी 50 लाख खर्च केला. हा खर्च नौसेनेने करणे अपेक्षित होते. मात्र एवढा मोठा खर्च करून राज्य सरकारने मालवण चे नाव मोठे न करता बदनाम केले. जिल्हा विकासासाठी होणारा खर्च असा वायफळ घालवल्यामुळे जनतेने याचा विचार करणे गरजेचे आहे.नौसेना दिन कार्यक्रम नियोजनामुळे पर्यटकानी मालवनकडे पाठ फिरवली. प्रशासनाने सक्तीने या काळात मच्छीमारी बंद करायला लावली होती. नौसेना दीना नंतर सुद्धा मालवण मध्ये मासेमारी कमी झाली.दुसरीकडे शिवाजी महाराजांचा निकृष्ट पुतळा उभारून मालवण चे नाव अवघ्या देशात बदनाम केले आहे. अनिकेत पटवर्धन नेच शिवपुतळ्याचे काम जयदीप आपटे ला दिले होते. जयदीप आपटे ला या पुतळ्या कामी 2 कोटी 44 लाखपैकी केवळ 26 लाख दिले गेल्याचे आपटे याने पोलिसांना जबाबावेळी सांगितले असून आपटे चे हे म्हणणे रेकॉर्डवर घेतले नसल्याचा आरोपही उपरकर यांनी केला. नौसेना दिन, राजकोट किल्ला सुशोभीकरण कामांत भ्रष्टाचार झालेला असून त्याला अनिकेत पटवर्धन याचेच पाठबळ आहे. यापुढेही अनिकेत पटवर्धन याने कोणालाही पत्रकार परिषद घ्यायला सांगितले तरी त्याला चोख उत्तर देणार असल्याचेही उपरकर म्हणाले. अणाव आणि रेल्वे स्टेशन रस्त्याबाबत लक्ष घालावे लागेल असा गर्भित इशाराही उपरकर यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना दिला.