फोंडाघाट सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार २५ सप्टेंबर रोजी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड फोंडाघाट, या संस्थेची सन २०२३-२४ या सहकारी वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक २५ सप्टेंबर २४ रोजी दुपारी २:३० वाजता शांताराम मंगल कार्यालय, फोंडाघाट येथे घेण्यात येणार आहे. तरी या सभेस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे. गणपूर्ती अभावी सभा तहकूब झाल्यास अर्धा तासानंतर सभेचे कामकाज पूर्ववत पत्रिकेनुसार सुरू होऊन पार पाडण्यात येईल. त्यास गणपूर्ती आवश्यकता राहणार नाही. यावेळी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन राजन नानचे व सचिव प्रसाद देसाई यांनी केले आहे.

error: Content is protected !!