खारेपाटण हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशालेकडून मोफत पाठ्यपुस्तके वितरण

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण हायस्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांचे शैशणिक टाळण्यासाठी नुकतीच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तके खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या प्रमुख उपस्थित त्यांच्या शूभहस्ते देण्यात आली.

शाळेच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके दरवर्षी वितरित केली जातात.परंतु वारंवार मागणी करूनही इयत्ता पाचवीतील नवीन प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना वेळेवर पाठ्यपुस्तके प्रशासनाकडून उपलब्ध होत नाहीत. अद्यापही शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मागणीनुसार उपलब्ध झालेली नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गोष्टीची दखल घेऊन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने इयत्ता पाचवीतील नवीन प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके नुकततीच वितरित करण्यात आली.

याप्रसंगी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, संस्थेचे सेक्रेटरी महेश कोळसुलकर, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप व पर्यवेक्षक संतोष राऊत शाळेचे संगीत शिक्षक संदीप पेंडूरकर आदी उपस्थित होते. शाळेच्या या मोफत पाठयपुस्तके वितरण केल्या बद्दल पालकांच्या वतीने शाळेचे व संस्थेचे आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!