सहाय्यक आयुक्त क्रुष्णांत पाटील यांची ताबडतोब बदली रद्द करा ; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरणार – राजू जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने सहाय्यक आयुक्त क्रुष्णांत पाटील साहेब यांची कोल्हापूर महापालिका येथून बाहेर गावी झालेली बदली रद्द व्हावी यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना राजू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले.यावेळी क्रुष्णांत पाटील सारख्या प्रामाणिक मनमिळाऊ स्वभाव सामान्य जनतेसाठी कामाच्या संदर्भातील झोकून देऊन प्रामाणिकपणे काम करण्याची पध्दत शांत स्वभाव जनतेबरोबर अत्यंत हळू आवाजात बोलणे समोरच्या व्यक्ती चे पुर्ण ऐकून घेण्याची पध्दत वेळप्रसंगी स्वतः जागेवर जाऊन काम करण्याची तसेच पहावयाचा स्वभाव यामुळे कोल्हापूर शहरातील नागरिकांच्यात क्रुष्णांत पाटील साहेब यांच्या बद्दल आपोआपच आपुलकी निर्माण झाली. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ताबडतोब ही बदली रद्द करावी अशी विनंती करून अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना सांगण्यात आले. या निवेदना वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजू जाधव, अतुल भालकर, करण साठे, विशाल लोखंडे,अण्णा तिळवे, राज मकानदार, सिध्दार्थ बुचडे, रोहन कांबळे, धिरज साठे, योगेश लोखंडे, जाँय धनवडे, ऋतिक देवकुळे, विस्वजीत कवाळे, अनुराग गोरके, सुरज तिळवे, रणजित कवाळे, इंदजित कवाळे, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!