डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी विहार साठी देणार 40 लाखांचा निधी

आमदार नितेश राणे यांनी दिला शब्द ; धम्म परिवर्तन दिनी उपस्थित राहत दिल्या शुभेच्छा

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ मुंबई ग्रामीण शाखा तळेबाजार यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तथा चैत्यभूमी विहार या ठिकाणी 68 वा धम्म परिवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष शामसुंदर जाधव, उपाध्यक्ष अजित कांबळे, खजिनदार प्रभाकर साळसकर, सल्लागार श्रीपत टेंबुलकर, विजय कदम, अरविंद वंळजू, महेश परुळेकर, एसएससी देवगड मंडळ अध्यक्ष देवदत्त कदम उपस्थित होते. सदर कार्यक्रमात लोकप्रिय माननीय आमदार नितेश राणे यांनी भेट देऊन भगवान गौतम बुद्ध घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना दीप प्रज्वलन करून वंदन केले. याप्रसंगी आपले विचार मांडताना आमदार नितेश राणे यांनी धम्म परिवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. आणि आपल्या संघटनेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. खासदार नारायण राणे यांच्या फंडातून या संस्थेला 40 लाख रुपयाचे सभागृह बांधून देण्याचे आश्वासन तसेच विहाराच्या सभोवताचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी पंचायत समिती सदस्य आणि संघाचे उपाध्यक्ष अजित कांबळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!