भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून रुग्णवाहिका प्रदान
वेंगुर्ला (प्रतिनिधी) : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहरासाठी नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. वेंगुर्ले भाजपा कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून ही रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात आली.
“जनसेवा हीच ईश्वरसेवा” या ब्रीदवाक्याला अनुसरून आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या रुग्णवाहिकेमुळे वेंगुर्ले शहरातील नागरिकांना आकस्मिक आरोग्य अडचणींवर मात करण्यासाठी त्वरित आणि वेळेवर सेवा मिळणार आहे.
विशाल परब यांनी यावेळी बोलताना सांगितले की, वेंगुर्लेतील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी पूर्वी केला होता. तो संकल्प प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पूर्ण झाला आहे. गोरगरीब जनतेच्या हितासाठी विविध जनकल्याणकारी उपक्रम सातत्याने राबवणे हेच आमचे सेवाव्रत असणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना अपेक्षित असणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताचे विविध कार्यक्रम राबवत या कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा यथोचित सन्मान आम्हा कार्यकर्त्यांकडून या वाढदिवसाच्या निमित्ताने केला जाईल, असेही यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले.

या सोहळ्याला मोठ्या संख्येने मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. यामध्ये ऍड. अनिल निरवडेकर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष पप्पू परब, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, राज्य परिषद सदस्य गुरुनाथ उर्फ राजू राऊळ, महिला तालुकाध्यक्षा सुजाता पडवळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, ओबीसी सेल अध्यक्ष रमेश नार्वेकर, शरद मेस्त्री, अल्पसंख्यांक सेल प्रमुख सायमन आल्मेडा, महिला मोर्चा पदाधिकारी वृंदा गवंडळकर, श्रेया मयेकर, हसीना बेन मकानदार, रिया केरकर, कृपा मोंडकर, शक्ती केंद्र प्रमुख किरण कुबल, माजी उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, आसोली उपसरपंच संकेत धुरी, म्हापण माजी सरपंच नाथा मडवळ, मठ सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर, रवींद्र खानोलकर, नामदेव सरमळकर, पुंडलिक हळदणकर, भानुदास कुबल, श्याम खोबरेकर, विजय रेडकर, समीर कुडाळकर, प्रशांत नाईक, सचिन शेट्ये, गणपत राऊळ यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथ प्रमुख व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











