दोस्ताना ग्रुपची क्रिकेट स्पर्धेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीदिनी मानवंदना

नांदगाव (आनंद तांबे) : दोस्ताना ग्रुपचे संस्थापक मैनुदिन साठविलकर, नितेश आंबेडकर आणि मस्जिद बटवले यांनी १३ व १४ एप्रिल रोजी भीम चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.

भीम चषक स्पर्धेचे उद्घाटन नांदगाव उपसरपंच इरफान साठविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. भीम चषक क्रिकेट स्पर्धेत एकूण ८ संघांनी भाग घेतला व १४ एप्रिल रोजी क्रिकेट स्पर्धा सुरू होण्याअगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठा उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नांदगाव बौद्ध विकास मंडळ व त्यांचे कार्यकर्ते यांचे सहकार्याने आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली होती.

भीम चषक क्रिकेट स्पर्धेतील विजय त्यांना १४ एप्रिल रोजी संध्याकाळी पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला यात प्रथम पारितोषिक मुज्जू पॅकर्स या संघाला देण्यात आले. हे पारितोषिक प्रणय तांबे आणि अनिकेत तांबे यांच्या हस्ते देण्यात आले. व द्वितीय पारितोषिक पावाची वाडी या संघाला वाळके, विठोबा कांदळकर आणि चव्हाण सर यांच्या हस्ते देण्यात आले.

ही स्पर्धा पार करण्यासाठी दोस्ताना ग्रुपचे कार्यकर्ते मैनुद्दीन साठविलकर, मुबारक साठविलकर, सैजु साठविलकर, सय्यद साठविलकर आणि सर्व कार्यकर्ते यांनी मेहनत घेऊन भीम चषक क्रिकेट स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!