ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी तुळशीदास रावराणे आणि उपसभापतीपदी श्रद्धा सावंत यांची आज निवड करण्यात आली. नूतन सभापती आणि उपसभापतींचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी ओरोस येथील वसंत स्मृती या जिल्हा भाजपा कार्यालयात पुष्पगुच्छ देत विशेष अभिनंदन केले. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सुनील लाड, राजन नानचे, रुपेश कानडे, दादा, साईल, माजी सभापती संदेश पटेल, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, मनोज रावराणे, पप्या तवटे आदी उपस्थित होते.













