अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकाला अटक

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करीत तिला गर्भवती बनविल्या प्रकरणी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील १८ वर्षीय युवकाला सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी अटक केली आहे. येथील विशेष न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील रोहित देवा चव्हाण (वय १८) हा सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत मावशी जवळ आला होता. २१ ते २२ मार्च २०२३ या कालावधीत संशयित आरोपी याने पीडित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला असून तिला रक्तस्त्राव झाल्याचे तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी २२ मे रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आज त्याला अटक करण्यात आली आहे.

error: Content is protected !!