नाद गावचे सरपंच प्रवीण पाष्टे, उपसरपंच मंगेश तेली भाजपात दाखल
देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्यात उद्धव ठाकरे सेनेला चांगलाच दणका दिला आहे .नाद गावचे सरपंच प्रवीण पाष्टे, उपसरपंच मंगेश तेली यांनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत आज भाजपात प्रवेश केला.आमदार नितेश राणे यांच्या या खेळीमुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेची झोप उडाली.
आमदार नितेश राणे यांनी नाद येथे येऊन हा प्रवेश घेतला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली बंड्या नारकर व अन्य उपस्थित होते आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात विकासाची गंगा आणली आहे प्रगतीचे एक पाऊल सतत पुढे असल्याने हा मतदारसंघ विकासाच्या मार्गावर चालला आहे हे आम्हाला केवळ आम्ही सरपंच झाल्यावर सहा महिन्यातच कळले यामुळे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राहणे हाच विकासाचा मार्ग असल्याने आम्ही भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे सरपंच व उपसरपंच यांनी सांगितले.
आमदार नितेश राणे हे महाराष्ट्रवादी नेते असल्याने त्यांचे नेतृत्व आपण मान्य करत असल्याचेही यावेळी सांगितले आमदार नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन सरपंच व उपसरपंचांना भाजपामध्ये प्रवेश दिला.












