श्रीराम माध्यमिक विदयामंदिर पडेल प्रशालेस बेंच चे वाटप

निरंजन दिक्षित यांचा पुढाकार

देवगड (प्रतिनिधी) : निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र निरंजन दिक्षित यांनी श्रीराम माध्यमिक विदयामंदिर पडेल या प्रशालेसाठी पन्नास बेंचेस दिले आहेत.

निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र निरंजन दीक्षित यांनी श्रीराम माध्यमिक विदयामंदिर पडेल शाळेसाठी पन्नास बेंचेस दिल्या आहेत. याचे उद्घाटन कविता विकास दीक्षित यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सदानंद पवार, देवगड एज्युकेशन बोर्डाचे कार्यवाहक शंकर धुरी, निळकंठ मराठे सरपंच भुषण पोकळे, शाळा समिती सदस्य संजय घाडी,केंद्रप्रमुख अशोक जाधव,माजी सरपंच विकास दीक्षित, माजी सरपंच संजय मुळम,उपसरपंच विश्वनाथ पडेलकर,भूषण बोडस,अनंत पाटणकर, माझी मुख्याध्यापक बी एन पाटणकर सर, कारंजेकर सर, महांबरे सर,विनायक चव्हाण , भिकाजी धुमाळ,बबन पडेलकर, केशव मुळम,कृष्णा मेस्त्री,केंद्र प्रमुख अशोक जाधव, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष रमाकांत अनभवणे व इतर मान्यवर ग्रामस्थ ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिराचंद तानवडे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविराम माळगावे , प्रास्ताविक संजीवनी फडके तर आभार आनंद शेलटकर यांनी मानले.

error: Content is protected !!