धक्कादायक ! अन्नपूर्णा सेक्स वर्कर वेल्फेअर फाउंडेशन च्या नावाखाली आजगावात सुरू होता वेश्याव्यवसाय

आरोपी संतोष हनुमंत लुडबे ने लढवली अनोखी शक्कल ; सहाय्यक संस्था निबंधकांकडे संस्था केली होती नोंदणी

संस्थेच्या सर्व सदस्यांचीही होणार पोलीस चौकशी

संतोष लुडबे ला 15 दिवस न्यायालयीन कोठडी

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगाव गावात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाबाबत धक्कादायक माहिती उजेडात येत आहे.पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार वेश्याव्यवसाय चालवणारा आरोपी संतोष हनुमंत लुडबे ( वय 50, रा.आजगाव म्हाळयारवाडी ) याने अन्नपूर्णा सेक्स वर्कर वेल्फेअर फाउंडेशन सावंतवाडी या नावाने संस्था स्थापन करून सहाय्यक संस्था निबंधक श्री. एस.एम.निकम यांच्याकडे त्याची अधिकृत नोंदणी देखील केली होती. धर्मादाय आयुक्तांनी ह्या संस्थेला परवानगी देताना वेश्यागमन , स्त्री शरीर व्यापार करण्यासाठी कुठली परवानगी दिली नव्हती. तरीही या संस्थेच्या आड संतोष लुडबे हा परराज्यातील मुली, महिलांना आजगाव येथे आणून त्यांच्या मार्फत वेश्या व्यवसाय करत होता. या बाबत ची तक्रार लोकांकडून प्राप्त झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी याबाबत संतोष लुडबे कडे चौकशी केली असता त्याने अन्नपूर्णा सेक्स वर्कर वेल्फेअर फाउंडेशन ची कागदपत्रे सादर केली होती. याबाबत 7 जुलै रोजी वेंगुर्ले पोलिसांनी संतोष लुडबे च्या संस्थेबाबत सहाय्यक संस्था निबंधक निकम यांच्याकडे चौकशी केली असता वेश्यागमन, स्त्रीदेह व्यापार साठी परवानगी दिली नसल्याचे लेखी पत्र सहाय्यक निबंधक यांनी दिले. एसपी अग्रवाल, अतिरिक्त एसपी बगाटे, डीवायएसपी किशोर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव, एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने आजगाव येथे 7 जुलै रोजी छापा मारून संतोष लुडबे आणि वेश्याव्यवसाय साठी आणलेल्या 3 मुलींना ताब्यात घेतले होते. आरोपी संतोष लुडबेवर पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला आज वेंगुर्ले येथील न्यायालयात हजर केले असता त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तर त्या तिन्ही मुलींची रवानगी अंकुर महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.दरम्यान संतोष लुडबे अध्यक्ष असलेल्या अन्नपूर्णा सेक्स वर्कर वेल्फेअर असोसिएशन या संस्थेत आणखी 6 सदस्य आहेत. मदन कृष्णा मांजरेकर ( रा. रेडी) हे उपाध्यक्ष , विकास चांद्रकांत सारंग ( रा.शिरोडा )सचिव , तर विश्वस्त म्हणून गीता संतोष लुडबे ( आजगाव) , सौ. सोनू राजेंद्र घोलप ( रा.चिखलगाव मुंबई ), प्रशांत किशोर पानकर ( कुंभवडे ता.वेंगुर्ला ), भूषण दीपक ढवळे ( रा. कुंभवडा ता वेंगुर्ले ) यांची नावे आहेत. संतोष लुडबे चालवत असलेल्या कुंटनखान्यात ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता अथवा कसे ? याबाबत चौकशी करून तसे आढळल्यास कारवाई करणार असल्याचेही पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सांगितले.

error: Content is protected !!