राष्ट्रवादी करणार जोरदार स्वागत – अमित सामंत
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर व राजकीय समीकरण बदलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर 11 जुलैला येत आहेत. याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.
दरम्यान कुडाळ येथे त्यांची भव्य सभा होणार आहे राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्या नंतर आव्हाडांच्या दीयाला खूप महत्व प्राप्त झाले आहे.












