15 वित्त आयोग निधीतून मळेवाड राणेवाडी परबवाडी शाळेला कपाट भेट

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून 15 वित्त आयोग निधितुन मळेवाड राणेवाडी परबवाडी शाळेला कपाट भेट देण्यात आले आहे.यावेळी उपसरपंच हेमंत मराठे यांनी शालेय मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी ग्रामपंचायत कडून वेळीवेळी मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.मुलांनी खूप अभ्यास करुन आपल्या शाळेचं,गावाचं नाव उज्ज्वल करावे असे आवाहन मुलांना केले.कपाट भेट दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका धर्णे यांनी ग्रामपंचायतचे आभार मानले.या शाळेतील मुलांना ग्रामपंचायतकडून वह्या वाटप करण्यात आले आहे.शाळेतील मुलांना ग्रा प सदस्य अमोल नाईक यांनी खाऊ वाटप केले.या वेळी सरपंच मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे,ग्रा प सदस्य अमोल नाईक,अर्जुन मुळीक, स्नेहल,मुळीक कविता शेगडे उपस्थित होते.

error: Content is protected !!