निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सुशांत नाईक यांची आ. नितेश राणेंवर टीका

कणकवलीत फिरण्या पेक्षा स्वतःचा भाऊ आमदार असलेल्या कुडाळ मालवण मध्ये फिरून परिस्थिती जानून घ्या

कणकवली युवक भाजपा अध्यक्ष गणेश तळगावकर यांची टीका

कणकवली (प्रतिनिधी) : स्वतःचा भाऊ आमदार असलेल्या ठाकरे सरकारने ग्रामीण आरोग्याची अडीच वर्षात काय विल्हेवाट लावली होती हे दाखवत उबाठा सेनेचे सुशांत नाईक फिरत आहेत.सत्तेत राहून जनतेच्या आरोग्यासाठी आपला भाऊ आमदार वैभव नाईक काहीच करू शकले नाहीत.आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे सुद्धा अपयशी ठरले होते हेच दाखवण्याचा प्रयत्न सुशांत नाईक यांचा सुरू आहे. नाईक हे सुद्धा सत्ता काळात अनधिकृत बांधकामे करून पैसा कमावण्याच्या मागे लागले होते. तेव्हा तुम्हाला जनतेच्या आरोग्याचे प्रश्न दिसले नाहीत का ?जनतेच्या आरोग्याची काळजी असती तर तुमच्या अडीच वर्षाच्या सत्ता काळात ग्रामीण आरोग्याचे प्रश्न सोडविले असते. आता ही नौटंकी बंद करा अन्यथा सुशांत नाईक तुम्हाला भाजप युवा कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील असा इशारा कणकवली युवक भाजपाध्यक्ष गणेश तळगावकर यांनी दिला.

उबाठा सेनेचे युवक जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या विधानाचा भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर यांनी समाचार घेतला. ते म्हणाले उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी जाऊन सुशांत नाईक आरोग्य व्यवस्थेची चौकशी करतात हे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे. जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता होती किंवा युतीमध्ये शिवसेनेचा आरोग्य मंत्री होता. त्या काळात सुशांत नाईक यांनी एकदा तरी आरोग्य विभागाचे प्रश्न मांडलेत का ? की स्वतःच्या परवानग्या मिळवत, मिळेल तिकडच्या जमिनी विकत घेत होते आणि अनधिकृत बांधकामे करत होते. याचे उत्तर द्यावे. शिवसेनेचे आरोग्य मंत्री होते त्या काळात सुशांत नाईक यांनी ना कधी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रश्न मांडले ना ग्रामीण आरोग्य व्यवस्था सुधारावी म्हणून निवेदन दिले. डॉक्टरांची कमतरता असताना सुद्धा त्या काळात सत्ता कसून एक डॉक्टर आणू शकले नाही अशा लोकांनी आज आमदार नितेश राणे यांच्यावर बोट दाखवू नये. तेवढी त्यांची लायकी नाही. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कमावणाऱ्या नाईक कुटुंबीयांनी स्वतःच्या खिशात हात घालून कोणाला मदत केले आहे का ? आधी तरी जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दुसऱ्याच्या नाही तर स्वतःच्या खिशात हात घालण्यास शिका.त्यानंतरच दातृत्व असलेल्या राणे कुटुंबावर टीका करा. राणे कुटुंबीयांनी इतके दातृत्व गुण दाखवा. शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता आमदार नितेश राणे हे स्वखर्चातून आरोग्याच्या अनेक योजना राबवल्या. कोरोना काळात ऑक्सिजन सिलेंडर पासून, मास्क, गोळ्यांचे वाटप स्वखर्चाने केले. कणकवली कर जनतेच्या जीवावर कोट्यावधीची प्रॉपर्टी करणाऱ्या नाईक कुटुंबाने आज पर्यंत आरोग्यासाठी कोणत्या वस्तू स्वतःच्या पैशाने दिल्या हे जाहीर करावे आणि नंतरच राणे कुटुंबावर टीका करावी.असा इशारा दिला.गणेश तळगावकर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!