कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या गुरुवार 19 राेजी सिंधुदुर्ग च्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दाैरा पुढील प्रमाणे असणार आहे. दुपारी 3 वाजता खारेपाटण येथे जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर चंद्रकांत बावनकुळे त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता कणकवलीत भगवती मंगल कार्यालयात भाजपा सुपर वारीयर्स सोबत बैठक होईल. त्यानंतर प. पू. भालचंद्र महाराज मठात जावून ते दर्शन घेणार आहेत. घर चलो अभियान अंतर्गत पटकीदेवी मंदिर पासून कणकवली मुख्य चौक मार्गे भाजपच्या दुर्गामाता उत्सव कार्यक्रमापर्यंत ते चालत नागरिकांशी संपर्क साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता कणकवलीत कॉर्नर सभा होईल. त्यानंतर ते सावंतवाडी तालुक्यात जाणार आहेत. या ठिकाणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या वॉररूमचे उद्घाटन श्री बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर रात्री 8 गोव्याकडे प्रस्थान.