दि.१८ मार्च ते २० मार्च २०२४ सायं.६.३० ते १० यावेळेत नाधवडे महादेव मंदिर येथे महानाट्य होणार संपन्न
वैभववाडी (प्रतिनिधी) : ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित महानाट्य ‘ जाणता राजा ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे महानाट्य सोमवार दि. १८ मार्च ते बुधवार दि. २० मार्च २०२४ रोजी सायं. ६.३० ते रात्री १० यावेळेत नाधवडे महादेव मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. तरी वैभववाडी तालुक्यासह जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.












