5 लाख 43 हजारांच्या अवैध दारुसह 12 लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

दोडामार्ग (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याहून कोल्हापूर च्या दिशेने स्कॉर्पिओ गाडीतून गोवा बनावटीच्या होणाऱ्या अवैध दारू वाहतूकीला दोडामार्ग पोलिसांनी चाप लावला असून 5 लाख 43 हजार 200 रुपयांच्या अवैध दारुसह 12 लाख 43 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कुंभवडे देवी सातेरी भावई मंदिर समोर 26 मार्च रोजी रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोडामार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. सिल्व्हर रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ कार क्र. MH -07- Q – 4372 मधून ही अवैध दारू वाहतूक सुरू होती. पोलिसांना संशय आल्यामुळे कारची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीची अवैध दारू भरलेली आढळून आली. या गुन्ह्यात 26 वर्षीय कारचालकासह अन्य एका 26 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल समीर सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!