कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुक प्रक्रिया सुरु झालेली असुन, सध्या आदर्श आचारसंहिता जाहीर झालेली आहे. लोकसभा निवडणुक प्रक्रिया सुरळीत व निर्भय वातावणामध्ये पार पडावी या करीता मा.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी, जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना गुन्हेगारी मोडीत काढणे बरोबरच अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करणे बाबत सक्त सुचना देवुन केले कारवाईचा आढावा घेणेचे काम सुरु आहे.दिनांक 29/03/2024रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांना त्यांचे बातमीदार यांचेकडुन उद्यमनगर कोल्हापूर येथील “झील एन्टरप्रायजेस” या गोडावुनमध्ये बनावट हार्पिक लिक्वीड, लायजॉल, गुडनाईट लिक्वीड अशा मालाचा साठा केलेला असुन, त्यावर गोदरेज व इतर नामांकीत कंपनीचे लेबल लावुन तो विक्री करत असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक, श्री सागर बाघ व त्यांचे सोबत असले पोलीस अमंलदार यांना छापा कारवाई बाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक सांगर वाघ व त्याचे पथकाने नमुद ठिकाणी गोदरेज या कंपनीकडुन नेमस्त केलेल्या श्रीमती माधुरी वर्मा यांना पाचारण करुन, सदर ठिकाणी अचानक छापा टाकुन पाहणी केली असता, गोडावुन मध्ये गोदरेज कंपनीचे गुडनाईट लिक्वीड, हर्पिक, रेकीट, लायजॉल कंपनीचे बाथरुम क्लीनर, ग्लास क्लीनर, टाईल्स क्लीनर इत्यादी मालावर नामांकीत कंपनीचे लेबल लावलेले आढळुन आले. सदर मालाची माधुरी वर्मा यांनी तपासणी केली असता, तो माल बनावट असल्याचे निष्पन्न झाला. सदरचा 1,84,567/- रुपयेचा माल दोन पंचा समक्ष कायदेशिर प्रक्रिया करुन जप्त केला तसेच सदर व्यवसायाचा मालक भरत हेमंत भानुशाली वय-35 रा. ताराबाई पार्क कोल्हापूर याला ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द नमुद कंपनीच्या कॉपीराईट स्वामीत्वाच्या मुळ हक्काचे उल्लंघन केले बाबत श्रीमती माधुरी वर्मा यांनी दिले तक्रारी प्रमाणे कॉपीराईट अधिनियम 1957 चे सुधारीत अधिनियम 1984 चे कलम 51,63 प्रमाणे राजारामपूरी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर व सहा पोलीस निरीक्षक सागर वाघ, संजय पडवळ, तुकाराम राजीगरे, विनायक चौगुले, संतोष पाटील, युवराज पाटील, दिपक घोरपडे, संतिश जंगम, सत्यजित तानुगडे, विनोद कांबळे गोदरेज कंपनीच्या माधुरी वर्मा यांनी केलेली आहे.