केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांची उपस्थिती
तालुक्यातून पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथे भाजपा व मित्र पक्षांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला सुरुवात झाली आहे. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे उपस्थित आहेत. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी शाल व श्रीफळ देऊन नारायण राणे यांचा सत्कार केला. तर जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन नारायण राणे यांचे स्वागत केले. राणे साहेबांच्या माध्यमातुन वैभववाडी तालुक्याचा विकास झालेला आहे. त्याचबरोबर सुपुत्र नितेश राणे यांनी आमदार झाल्यानंतर एक पाऊल पुढे जात तालुक्याच्या विकासात सिंहांचा वाटा उचलला असल्याचे मत कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भाजपा तालुकाध्यक्ष नासीरभाई काझी यांनी व्यक्त केले. या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, यांच्या सह अनेक जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत.












