चौके (प्रतिनिधी) : काळसे गोसावीवाडी येथील रहिवाशी श्रीमती सुमती गणपत गोसावी, वय वर्षे ८९ यांचे गुरुवार दिनांक २५ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे , एक मुलगी , सूना , जावई , नातवंडे असा परीवार आहे.
नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ, सिंधुदुर्ग (बोर्डवे) या मंडळाचे सल्लागार तसेच सेवानिवृत्त तहसीलदार श्री. शरद गणपत गोसावी यांच्या त्या मातोश्री होत्या.