महागाई, बेरोजगारीवर न बोलता भाजपावाले धार्मिक तेढ वाढवून राजकीय पोळी भाजताहेत

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा घणाघात

फोंडाघाट (प्रतिनिधी) : भाजपा वाले महागाई च्या विषयावर काहीही बोलायला बघत नाही. गॅस सिलेंडर च्या किंमती गृहिणीच्या अवाक्या बाहेर गेल्या आहेत. पेट्रोल डिझेल च्या किमती अन्न धान्य, कडधान्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत पण महागाई वर भाजपा वाले बोलणार नाही. त्यांना फक्त समाजात धार्मिक द्वेष भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे असा घणाघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केला ते फोंडाघाट येथे काल झालेल्या शिवसेना इंडिया आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.

दरम्यान यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत शिवसेना नेते गौरी शंकर खोत, संजय घाडी, अतुल रावराणे तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँक चेअरमन सतीश सावंत, आप चे जिल्हाप्रमुख विवेक ताम्हणकर, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, दत्ताराम फोफे, काशीराम राणे, शिवसेना महिला नेत्या संजना घाडी मॅडम, काँग्रेस कार्यकर्ते संतोष टक्के, अरुण म्हसकर, संजना कोलते, महिला तालुकाप्रमुख माधवी दळवी आदी मान्यवर उपास्थित होते.

यावेळी बोलताना अनंत पिळणकर पुढे म्हणाले, हिंदू धर्माचा ठेका काय फक्त भाजपा वाल्यानाच दिला आहे का ? आम्ही सुद्धा हिंदू आहोत आम्हाला सुद्धा हिंदू असल्याचा अभिमान आहे. भाजपा वाल्यानी आधी शिवसेनेने हिंदुत्व सोडले, राष्ट्रवादी पक्षाने हिंदुत्व सोडले, काँग्रेस ने हिंदुत्व सोडले म्हणून बोंब मारायची आणी पुन्हा त्याचं पक्षांच्या नेत्यांना फोडून आपल्या पक्षात घ्यायचे अशांना हिंदुत्वावर बोलण्याचा कोणता नैतिक अधिकार आहे ? असा सवाल पिळपणकर यांनी उपस्थित करताना आम्हाला ही बोलता येते पण पक्षाची बंधने असतात आम्ही नैतिकता सोडून बोलत नाही पण तशी आमच्यावर आणल्यास या भाजपा वाल्याना सडेतोड उत्तरे देऊ असा सज्जडं दमच अनंत पिळपणकर यांनी विरोधकांना यावेळी दिला.

काल फोंडाघाट याठिकाणी झालेल्या प्रचार सभेला शिवसेना उबाठा, इंडिया आघाडी चे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन राजू राणे यांनी केले

error: Content is protected !!