मोदी आणि नारायण राणे हे कोकण विकासाचे कॉम्बिनेशन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या प्रचाराचे फुंकले रणशिंग

फडणवीस यांच्या सभेने रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुती ची लाट

राजापूर (राजन चव्हाण) : मोदी आणि नारायण राणे हे कोकण विकासाचे कॉम्बिनेशन आहे.नारायण राणे जगात कुठेही असले तरी त्यांच्या हृदयात कायम कोकण असते. लोकसभेला नारायण राणे खासदार झाल्यानंतर जगातील आर्थिक गुंतवणूक कोकणात येईल. कोकणात रोजगार निर्माण होईल. देशाचा नेता ठरवणारी ही निवडणूक आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 27 पक्षांची खिचडी आहे.ही लढाई नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील आहे. शरद पवार हे 10 जागा लढवत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा जाहीरनामा हातातून पडला. ठाकरे पवार यांचा जाहीरनामा चालणार नसून त्याना राहुल गांधींचाच जाहीरनामा चालवावा लागणार आहे. मोदींच्या विकासाच्या इंजिनात सर्वसामान्य जनतेसाठी बोगी आहेत. तर इंडिया आघाडी मध्ये राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी सारखे 27 इंजिन आहे. इंजिन मध्ये फक्त चालकाला जागा असते जनतेला नाही असे सांगत फडणवीस यांनी विरोधकांची हवाच काढली. मोदींनी 8 लाख कोटी रुपये महिलांच्या बचतगटांना दिले. 2026 नंतर च्या विधासभा आणि लोकसभा निवडणुकीत 33 टक्के आरक्षण हे महिलांना असणार आहे. शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार केंद्राने तर राज्याने 6 हजार देऊन शेकऱ्याला सुजलाम सुफलाम केले. मोदींनी बारा बलुतेदारांना सधन करण्यासाठी विश्वकर्मा सारखी योजना आणली. 24 हजार कोटी रुपयांची आदिवासी समाजासाठी योजना आणली. महाराष्ट्रातील सरकार हे मोदींसोबत चे सरकार आहे. त्यामुळे देशात उद्योग गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र आता प्रथम आहे. फॅक्टरी ऑफ वर्ल्ड भारत होईल ही जगाला आशा आहे. राज्यात 20 हजार पेक्षा जास्त स्टार्ट अप तयार झाले आहेत. आज जगात आपली अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर मोदी यांनी आणली आहे. अर्थव्यवस्था मजबूत झाल्यामुळे देश आत्मनिर्भर झाला आहे. 2019 नंतर एकतरी बॉम्बस्फोट देशात झाला काय ? पाकिस्तानने आगळीक केली आणि मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानची मस्ती उतरवली. कोव्हीड काळात कोरोनावर लस मोदींच्या सहकार्याने बनवली गेली. देशातील सर्व जनतेला दोन वेळा लस मोफत दिली. जगात कोव्हीड च्या काळात हाहाकार माजला असताना

error: Content is protected !!