केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयासाठी चिंदर भगवती-माऊली देवी चरणी साकडे !

भाजप महायुतीच्या प्रचारचा जोरदार शुभारंभ !

आचरा (प्रतिनिधी) : भाजप महायुती रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघांचे लोकप्रिय उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा प्रचार सर्वत्र चालू आहे. चिंदर येथील जागृत देवस्थान भगवती-माऊली चरणी श्रीफळ ठेऊन नारायण राणे यांच्या मोठया विजया साठी साकडे घालून भाजप महायुतीच्या पदाधिकारी यांनी घरोघरी जात प्रचाराला जोरदार शुभारंभ केला.

यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, आचरा विभाग प्रभारी संतोष गांवकर, प्रकाश मेस्त्री, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, शक्तीकेंद्र प्रमुख दत्ता वराडकर, दिगंबर जाधव, संतोष अपराज, शेखर कांबळी, रवि घागरे, सागर परुळेकर, अजित केरकर, आप्पा गावडे, घागरे, सुनिल पवार आदी बहूसंख्य भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!