खारेपाटण (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराची सुरुवात आज बुधवारी नडगिवे गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिर येथून करण्यात आली.
भाजपा खारेपाटण विभागाच्या वतीने खारेपाटण विभागातील सर्व गावांमध्ये महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यात आले असून विभागातील सर्व गावांमध्ये घरोघरी प्रचार करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नडगिवे गावात आजपासून प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
यावेळी भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते शरद कर्ले, बाळा जठार ,शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, तृप्ती माळवदे, नडगिवे सरपंच माधवी मण्यार,उपसरपंच भूषण कांबळे, माजी सरपंच अमित मांजरेकर, माजी उपसरपंच भावेश कर्ले, बूथ कमिटी अध्यक्ष अरुण कर्ले ग्रामपंचायत सदस्य लता हिवाळकर, दर्शना गुंडये, मयुरी कर्ले, प्रशांत धावडे,सुधीर सुतार, चंद्रकांत मन्यार, सचिन गुरव, श्रीधर मन्यार, विनायक मन्यार, यश पाटील, दुर्वेश आंबेरकर, नयन ठुल यांसह भाजपा कार्यकर्ते, राणेप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.