सावडाव धरणाच्या कामावर प्रकल्पग्रस्त समाधानी ; सावडाव धरणग्रस्त समिती स्थापन

राजकीय फायद्यासाठी गावाची एकजुट दुभंगण्याचा काहींचा प्रयत्न

कणकवली (प्रतिनिधी) : सावडाव धरण क्र 2 च्या कामात कोणतीही अनियमितता नसून गावाच्या हितासाठी धरण गरजेचे आहे. धरणाबाबत शंकानिरसन करण्यासाठी उपअभियंता शिरोडकर, देशमुख यांच्यासोबत 90 हुन अधिक प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची बैठक झाली असून शासनस्तरावर समन्वय साधण्यासाठी प्रकल्पग्रस्त समिती नेमण्यात आली आहे. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी गावाबाहेरील व्यक्तींकडून गावच्या एकजुटीत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सावडाव प्रकल्पग्रस्त समिती जे प्रसिद्धीपत्रकातून सांगितले आहे.

error: Content is protected !!