जबर मारहाण प्रकरणी माजी सभापती बाळा जठार, दिलीप तळेकर , वारगाव उपसरपंच नाना शेट्ये यांना अटक

1 दिवस पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूकीच्या मतदाना नंतर शिवसेना उबाठा चे बेर्ले गावचे माजी सरपंच बाळा राऊत यांना जबर मारहाण केल्याच्या गुन्ह्यात भाजपचे माजी सभापती बाळा जठार, दिलीप तळेकर, वारगाव उपसरपंच नाना शेट्ये यांना कणकवली पोलिसांनी 17 मे रोजी अटक केली आहे. तिघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता 1 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बाळा राऊत यांना 7 मे रोजी मतदानानंतर सायंकाळी 7 वाजता जठार,तळेकर, शेट्ये यांनी राजकीय वादातून शेर्पे येथे जाऊन जबर मारहाण केली होती. राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिन्ही आरोपींना 17 मे रोजी अटक करण्यात आली.

error: Content is protected !!