असलदे डामरेवाडी येथे खाजगी आराम बस व कार यांच्यात अपघात

कारमधील महिला प्रवासी जखमी;उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे डामरे वाडी बस थांबा जवळील वळणावर शुक्रवारी सायंकाळी 5.15 वा. च्या सुमारास खाजगी आराम बस व कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात कारमधील महिला प्रवासी जखमी झाली त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देवगड हुन मुंबई च्या दिशेने जाणारी खाजगी आराम बस बस क्रमांक एम एच 01 सी आर 7900 (mh 01 cr 7900 ) व सांगली हुन देवगड कडे जाणारी कार कार नंबर एम एच 10 बी एम 8034 (MH 10 BM 8034 )यांच्यात देवगड निपाणी महामार्गावरील असलदे डांबरेवाडी येथील वळणावर अपघात झाला. या अपघातात कार मधील जखमीना कणकवली उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना नरेंद्र महाराज यांच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात कार व अराम बसचे दर्शनी भागाचे नुकसान झाले

error: Content is protected !!