नाटळ ग्रामपंचायत येथील ग्रामसभेत झालेल्या हाणामारीतील जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नाटळ ग्रामपंचायत च्या ग्रामसभेमध्ये दोन गटांमध्ये आज जोरदार राडा सकाळी ११ : ४५ वाजण्याच्या सुमारास झाला यामध्ये दोन्ही गटातील काहीजण जखमी झाले आहेत. या राड्यांमध्ये झालेल्या जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याबाबत वृत्त असे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गावात काही वाद निर्माण झाले होते त्यानंतर पहिलीच ग्रामसभा होत असल्याने या ठिकाणी दोन राजकीय पक्षाच्या गटामध्ये ठेणगी पडली आहे याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही या राड्यामध्ये ग्रामपंचायतीत मधील काही खुर्च्यांची देखील मोडतोड झाल्याचे समजते या मारहाणी नंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. भाजप महेंद्र गुडेकर, दीनानाथ सावंत, किशोर परब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रदीप सावंत, पद्माकर पांगम, ऋषिक सावंत, गणेश सावंत आदी उपस्थित होते.












