सोमवार आठवडी बाजार असल्याने ग्राहक व्यापाऱ्यांची तारांबळ
पहिल्याच पावसात बांधकाम विभागाच्या एक कोटी सत्तर लाख रस्ता रुंदीकरण कामाचे पितळ उघडे !
वातावरणात गारवा ! शेतकरी सुखावले
फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेले तीन-चार दिवस सूर्य आग ओकत असल्याने सुमारे 42 डिग्री सेंटीग्रेड सदृश्य तापमानाने नागरिक व्यावसायिक त्रस्त झाले होते. आज पहाटेपासूनच ढगाळ वातावरणानंतर, अकराचे दरम्यान धुवांधार पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडगडाटामुळे लाईट गूल झाली. पावसाच्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे वातावरणात थोडासा गारवा आला. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या एक कोटी सत्तर लाखाच्या बांधकाम विभागाच्या कामाचे पितळ उघडे पडले. पावसाचे पाणी गटाराने वाहण्या ऐवजी रस्त्यावरून सुसाट धावत होते. त्यातून वर्षभर साचलेल्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या,कचरा- कागद वाहत होते. त्यामुळे पुढील चार महिने बांधकाम विभागाच्या गटारातून पाणी जाण्याच्या कार्यवाहीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. याकडे ग्रामपंचायतने आणि आदर्श अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे …
मात्र शेतकरी वर्ग सुखावला असून मिरगाच्या पावसापर्यंत परिसरातील भात पेरणीला सुरुवात होईल. वातावरणात गारवा आल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे..












