ओरोस (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कट्टा दशक्रोशीतील सकल मराठा समाजाच्यावतीने १० वी व १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार रविवार १६ जून रोजी दुपारी ३ वाजता वराड हडपीवाडी येथील नम्रता मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी कट्टा दशक्रोशीतील सकल मराठा समाजातील इयत्ता १० वी मध्ये ८० टक्के आणि इयत्ता १२ वी मध्ये ७५ टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सकल मराठा समाजाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ऍड सुहास सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, मालवण तालुका मराठा उत्कर्ष मंडळ उपाध्यक्ष विनायकराव परब तसेच मुंबई येथील उद्योजक सुभाष काराणे, उद्योजक देवेन उर्फ पपु ढोलम हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व समाज बांधवानी आपल्या पाल्यासह उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. मुलांना उपस्थित ठेवून सत्कार स्विकारावा, असे आवाहन सकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी यांच्यावतीने करण्यात आले आहे.












