विजय गणपत काळे यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदभार

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून विजय गणपत काळे यांनी पदभार स्वीकारला आहे. या पदाचा पदभार गेली अनेक वर्षे नंदकुमार काळे यांच्याकडे होता. नव्याने पदभार स्वीकारलेल्या काळे हे जालना येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते २०१६ मध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले आहेत.

error: Content is protected !!