भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्लेतील वारकऱ्यांना देवदर्शन सहल!

वारकऱ्यांना दिलेले वचन केले पूर्ण

ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ !!!

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील मंडळींना देवदर्शन सहलीचा शुभारंभ आज चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी विशाल परब यांनी सर्व वारकरी बंधू-भगिनींना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.

मोहीनी एकादशी निमीत्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विशाल परब यांनी नारायणराव राणे साहेब हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातुन विजयी झाल्यावर वारकरी मंडळींना मोफत देवदर्शन सहल घडवून आणेन, असे अभिवचन दिले होते. त्याचीच पुर्तता म्हणुन तुळजापूर – अक्कलकोट – पंढरपूर – नृहसिंहवाडी – महालक्ष्मी कोल्हापूर अशी तीन दिवसांची सहल आयोजित करण्यात आली आहे. आज त्यांनी ते वचन पूर्ण केले.

प्रसंगी वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ मंडळींनी विशाल परब यांचे कौतुक करत त्यांना आशीर्वाद दिले. अध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकदा परब यांनी संस्कृतीचे जतन केले आहे. प्रसंगी प्रसन्ना देसाई, राजन गिरप, वसंत तांडेल, मनोहर तांडेल, सुहास गवडळकर, बाबली वांयगणकर, सुरेंद्र चव्हाण, वारकरी सांप्रदायातील जेष्ठ मंडळी, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!