आ.नितेश राणेंनी मोंड कॉलेज – गावठाण रस्त्याची केली पाहणी

तात्काळ वाहतूक योग्य रस्ता करण्याच्या दिल्या सूचना

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मोंड गावातील कॉलेज ते गावठणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटीचा सुमारे २०० मीटरचा रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेला. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी या रस्त्याची तात्काळ जाऊन पाहणी केली. रस्ता तातडीने वाहतुकी योग्य व सुस्थितीत आणावा अशा सूचना संबंधित यंत्रणेला आमदार नितेश राणे यांनी दिल्या.

शनिवारी दुपारी ३.३० वा. च्या सुमारास तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता अक्षरशः वाहून गेला आहे. या रस्त्याचे नूतनीकरण सुमारे दोन वर्षापूर्वी करण्यात आले होते. या घाटीरस्त्याच्या बाजूला सुमारे चार ते पाच फूटाचा चर पडून तेथील माती पाण्याच्या बदलेल्या प्रवाहाने नजीकच्या घरांमध्ये घुसली.

आमदार नितेश राणे यांनी तातडीने आजमोड गाठले व या रस्त्याची फिरून पाहणी केली त्यांच्या समवेत यावेळी गावचे उपसरपंच अभय बापट, जिल्हा उपाध्यक्ष संदीप साटम, बाळ खडपे, तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली, माजी जिल्हा परिषद सदस्य राणे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बाळा कोयंडे, महेंद्र माणगावकर ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!