कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी दिली खारेपाटण हायस्कूललासदिच्छा भेट

कोकणातील प्रत्येक शाळा ग्रीन स्कूल करणार

खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकणातील पदवीधर शिक्षक व बेरोजगार पदवीधरांचे अनेक प्रश्न सभागृहात मांडून त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून कोकणातील प्रत्येक शाळा ग्रीन स्कूल करणार असल्याचे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी खारेपाटण हायस्कूल येथे मार्गदर्शन करताना केले.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे व आर पी आय आणि मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी आज सकाळी ८.३० वाजता कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभमीवर खारेपाटण हायस्कूल ला सदिच्छा भेट दिली.

यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या हस्ते त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव महेश कोळसुलकर खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी कांबळे, हायस्कूलचे पर्यवेक्षक संतोष राऊत, उपस्थित होते. तसेच खारेपाटण ग्रामपंचायत व भाजप पक्षाच्या वतीने भाजपा शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल, माजी ग्रा.पं. सदस्य रफिक नाईक यांच्या शुभहस्ते आमदार निरंजन डावखरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष-प्रभाकर सावंत, कणकवली तालुका अध्यक्ष-संतोष कानडे, जिल्हा चिटणीस-प्रमोद रावराणे, रवींद्र शेट्ये, माजी जि.प.सदस्य-रवींद्र जठार, भाजप कार्यकर्ते-भाऊ राणे, राजेंद्र वरुणकर, विजय देसाई, किशोर माळवदे, यशवंत रयबागाकर, अनिल करंगुटकर, दिगंबर राऊत, जयदीप देसाई, नकाशे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, खारेपाटण शिक्षण संस्था ही कोकणातील एक मोठी नावाजलेली शैशणिक संस्था असून येथील पदवीधर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम असलेला आपला कोकण प्रांत मात्र एम पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मागे असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. याकरीता पदवीधरांना अचूक आणि योग्य मार्गदर्शन करणारी ई-लायब्ररी आपण सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार निरंजन डावखरे याना निवडून देऊन विजयाची परंपरा कायम राखण्याचे आवाहन केले. तर कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांनी केंद्रात व महाराष्ट्रात आपले सरकार असून आपल्या उज्ज्वल विकास कामासाठी खारेपाटण येथील पदवीधर मतदारांनी आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडणुकीत विजयी करा असे आवाहन केले.

यावेळी खारेपाटण हायस्कूलचे मुख्याद्यापक संजय सानप यांनी खारेपाटण येथील पदवीधर मतदारांचे नोदणी करण्यासाठी विशेष कॅम्प लावून सुमारे १०० पेक्षा अधिक मतदारांची नोंदणी केली. मात्र बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

खारेपाटण हायस्कूल येथे आमदार निरंजन डावखरे यांनी पदवीधर शिक्षक आणि पदवीधर मतदार यांची भेट घेऊन कोकण पदवीधर मतदारसंघातून आणला निवडून देण्याचे भावनिक आवाहन केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक महादेव मोटे यांनी केले तर सर्वांचे आभार भाजप कार्यकर्ते रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!