ठाकरे गटाला माजी खा निलेश राणेंचा दणका

आचरा विभागप्रमुखासह ग्रा पं सदस्य भाजपात दाखल

मालवण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाने आचरा गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का दिला आहे ठाकरे गटाचे आचरा विभागीय उपाध्यक्ष जगदीश पांगे यांच्यासह विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बबलू गावकर यांनी शुक्रवारी भाजपात प्रवेश केला भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, अनंत राऊत, राजन गावकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!