बोर्डवे रेल्वे स्टेशन अद्याप आश्वासनांच्या गर्तेत

नूतन खा. नारायण राणेंकडे मांडणार कैफियत – चंद्रहास राणे

कणकवली (प्रतिनिधी) : बोर्डवे दशक्रोशी ला अत्यावश्यक असणारे बोर्डवे रेल्वे स्टेशन अद्यापही अश्वासनांच्या गर्तेत असून बोर्डवे रेल्वेस्थानक व्हावे ही दशक्रोशीतील जनतेची मागणी नूतन खासदार नारायण राणे यांच्याकडे मांडणार असल्याचे ओसरगाव चे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी सांगितले.बोर्डवे रेल्वे स्थानक व्हावे यासाठी बबली राणे मागील 15 वर्षांहून अधिक काळ सातत्याने लोकप्रतिनिधींकडे लेखी निवेदने देत पाठपुरावा करत आहेत. केंद्रस्तरावर रेल्वे स्थानक निर्मिती ला मंजुरी मिळण्यासाठी बबली राणे सातत्याने मागणी करत आहेत. मात्र अद्याप बोर्डवे रेल्वे स्थानक मंजुरी चे घोंगडे भिजत पडलेले आहे. नूतन खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून बोर्डवे रेल्वे स्थानक निर्मितीला मंजूरी मिळून दशक्रोशीतील जनतेची मागणी पूर्ण होईल असा विश्वास बबली राणे यांनी व्यक्त केला आहे. झाराप , आचिर्णे, खारेपाटण ही रेल्वे स्थानके मंजूर होऊ न पूर्णत्वास देखील गेली. मात्र अद्याप बोर्डवे रेल्वे स्थानकाला मंजुरी मिळाली नसल्याने दशक्रोशीतील जनता नाराज आहे. त्यामुळे लवकरात लवकर बोर्डवे रेल्वे स्थानकाला मंजुरी द्यावी अशी मागणी बबली राणे यांनी केली आहे.

error: Content is protected !!