वैभववाडी रेल्वे स्टेशनं बाहेरील सर्कल रेल्वे प्रशासनाने हटविले

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी रेल्वे स्टेशनबाहेरील वाहतूकीला अडथळा ठरत असलेले सर्कल रेल्वे प्रशासनाने हटविले आहे. हे सर्कल हटविण्याची सूचना आमदार नितेश राणे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली होती. आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी रेल्वे स्टेशनच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी रेल्वेचे अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत आढावा सभा घेतली होती. यावेळी वैभववाडी रेल्वे स्टेशनबाहेर असलेले सर्कल वाहतूकीला अडचण ठरत होते. रिक्षा, व प्रवाशांना यामुळे अडचण होत. होती त्यामुळे हे सर्कल काढण्यात यावे. अशी मागणी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे यांनी केली होती. त्यानुसार हे सर्कल तातडीने हटविण्याची सूचना आमदार राणे यांनी केली होती. तसेच रेल्वे उड्डाणंपूल, प्लँटफॉर्मवर छप्पर, शौचालय, पिण्याचे पाणी, या प्राथमिक सुविधा आगामी गणेश उत्सवपूर्वी पूर्ण करण्याची सूचना केली होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी हे सर्कल हटविण्यात येईल असे आश्वसन दिले होते. त्यानुसार बुधवारी जेसिबीच्या साहाय्याने हे सर्कल तोडून ही जगा मोकळी केली आहे. त्यामुळे प्रवाशी, रिक्षाचालक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!