ज्वेलर्स दुकानातील दागिनेचोर अर्पिता रावले ला 5 दिवस पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठमधील गौरी ज्वेलर्स दुकानातील दागिनेचोर आरोपी अर्पिता विठ्ठल रावले (वय 24, मूळ रा.हरकुळ खुर्द रावलेवाडी, सध्या रा.सिद्धार्थ सृष्टी ए विंग, रूम नं 505, सागाव, डोंबिवली पूर्व) हिला 9 ऑगस्ट पर्यंत 5 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे कणकवली पोलिसांनी सांगितले. 30 जुलै रोजी आरोपी अर्पिता रावले हिने दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने गौरी ज्वेलर्स मध्ये जात 93 हजारांचे दागिने चोरले होते. याबाबत सुमित मालडिकर यांच्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती आधारे एलसीबी ने आरोपी अर्पिता हिला डोंबिवली मधून ताब्यात घेत कणकवली पोलिसांकडे 4 ऑगस्ट रोजी सुपूर्त केले होते. दरम्यान आज आरोपी अर्पिता हिला न्यायालयात हजर केले असता तिला 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.अधिक तपास हवालदार उत्तम वंजारे करत आहेत.

error: Content is protected !!