वैभववाडी तालुका ठेकेदार संघटनेच्या अध्यक्षपदी दिलीप रावराणे यांची निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका ठेकेदार संघटनेच्या अध्यक्षपदी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी रमेश शेळके, खजिनदारपदी संजय सावंत यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकारी यांचे सर्वांनी अभिनंदन केले. वैभववाडी तालुका ठेकेदार संघटनेची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी नूतन कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे.

वैभववाडी तालुक्यात जवळपास 55 ठेकेदार कार्यरत आहेत. त्यामध्ये शासकीय ठेकेदार, ठेकेदार, मजूर संस्था ठेकेदार व सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचा समावेश आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांची सर्वांनी एकमताने संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.

यावेळी वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, भाजपा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, सज्जनकाका रावराणे, राजेंद्र राणे, सुधीर नकाशे, देवानंद पालांडे, बंड्या मांजरेकर, सुधाकर साळुंखे, हुसेन लांजेकर, सुनील रावराणे, संजय चव्हाण, प्रकाश पाटील, समाधान साळुंखे, विवेक रावराणे व युवा ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!