मुंबई विद्यापीठ अंतर्गत युवा महोत्सवात कणकवली कॉलेजचे घवघवीत यश

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ अंतर्गत 57 वा युवा महोत्सव सिंधुदुर्ग झोनल यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी सावंतवाडी येथे सोमवारी पार पडला. या युवा महोत्सवात 36 महाविद्यालयांनी विविध कला प्रकारात सहभाग घेतला होता. त्यात कणकवली कॉलेज कणकवली महाविद्यालयानेही विविध कला प्रकारात सहभागी होत घवघवीत यश संपादित केले.

वक्तृत्व, कथाकथन हिंदीमध्ये प्रथम, एकांकिका मराठी द्वितीय, हिंदी एकांकिका प्रथम, स्किट मराठी द्वितीय, मिमिक्री प्रथम, भारतीय लोकनृत्य प्रथम, सूगम संगीत प्रथम तर भारतीय शास्त्रीय नृत्यात तृतीय क्रमांक पटकावून यश मिळविले आहे. या सर्व कलाप्रकारांचे अंतिम सादरीकरण मुंबई विद्यापीठात लवकरच होणार आहे. कॉलेजच्या या यशासाठी चंद्रशेखर मुळ्ये, डॉ.शरावती शेट्ये, श्रीधर पांचागे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सीमा हडकर व सांस्कृतिक विभागातील सदस्य प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा. डॉ. राजश्री सांळुखे, सचिव विजयकुमार वळंजू, संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, सर्व प्राध्यापक व इतरेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.

error: Content is protected !!