मातृभूमीला विसरू नका – दिलीप पाटील

पारिजात संस्था मुंबई च्या वतीने कुर्ली येथे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : प्रत्येक व्यक्ती ही समाजाची देणे लागत असते,आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजासाठी काही तरी केले पाहिजे, आपली मातृभूमी व ज्या शाळेत शिकलो त्या शाळेला कधीही विसरू नका, असे प्रतिपादन कुर्ली उत्कर्ष मंडळ मुंबईचे सल्लागार तथा मंडळ अधिकारी दिलीप पाटील यांनी केले.

कुर्ली खडकदरा प्राथमिक शाळा येथे पारिजात संस्था, मुंबई यांच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते. या वेळी कुर्ली उत्कर्ष मंडळ मुंबईचे  सरचिटणीस दिलीप शां.पाटील, कुर्ली उपसरपंच अंबाजी हुबे, कुर्ली हायस्कूल शालेय समितीचे सदस्य प्रशांत पाटील,पत्रकार मोहन पडवळ,खडकदरा शाळेचे मुख्याध्यापक अनिल खांबल, शिक्षक शिवराज कर्ले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष हुंबे, अंगणवाडी सेविका कोकरे, मदतनीस पवार आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे पाटील म्हणाले, सामाजिक जीवनात वावरत असतांना आपण काम करत राहणे कोणत्याही फळाची अपेक्षा करू नये. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत बसून संपली हुशारी दाखवावी, हे करत असतांना अपयश आले तरी खचून जाऊ नये. कुर्ली खडकदरा शाळेतील विद्यार्थी हुशार आहेत. शिक्षकानी मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन शाळेचे व गावचे नाव उज्ज्वल करावे, असे सांगितले.

पारिजात संस्था,मुंबई ने दिलेल्या शैक्षणिक साहित्य बाबत सर्वांनी त्यांचे कौतुक केले.सलग दोन वर्षे पारिजात संस्थे मार्फत कुर्ली गावातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी, अंबाजी हुंबे, दिलीप शां पाटील, मोहन पडवळ, मुख्याध्यापक अनिल खांबल यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवराज कर्ले यांनी केले.

error: Content is protected !!