विनायक राऊत यांनी खासदारकी रद्द करण्यासाठी दाखल केली आहे याचिका
कणकवली (प्रतिनिधी) : सदर प्रकरणी मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या वकिलांमार्फत कोर्टात याचिका दाखल केली होती. विशेष म्हणजे याचिका दाखल झाल्यावर तब्बल अडीच महिन्यांनंतर हायकोर्टाने नोटीस पाठवल्याने नारायण राणे या नोटिशीला काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्याचप्रमाणे खासदार विनायक राऊत यांचे आरोप सिद्ध झाल्यास खासदार नारायण राणे यांची निवड रद्द होऊन दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारे विनायक राऊत यांना विजयी घोषित केले जाणार की मतदारसंघात फेर मतदान घेतले जाणार याबाबत लोकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे.











