प्राथमिक शिक्षक पतपेढीचे बेमुदत धरणे आंदोलन स्थगित

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या वेंगुर्ला शाखेत झालेल्या कथित ‘अपहार” या विषयासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे, या प्रमुख मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या मालक सभासदांनी सोमवार १९ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेले बेमुदत धरणे आंदोलन, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) माणिक सांगळे यांच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्याबाबतच्या लेखी पत्रानंतर आज दुसऱ्या दिवशी स्थगित केले.

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी शाखा वेंगुर्ला शाखाधिकार्‍याकडून ४१ लाखाची आर्थिक अनियमितता झाल्याचे उघड झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या मालक सभासदामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. झालेल्या अपहारांची माहिती सर्व सभासदाना मिळावी यासाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करावी या प्रमुख मागणीसाठी शिक्षक पतपेढीच्या मालक सभासदानी सोमवार १९ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले होते. आजच्या दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरु ठेवले होते. आणि जो पर्यंत आमच्या मागणीनुसार विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन होत नाही व दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील असा निर्धार केला होता. या आंदोलनात मोठ्या संख्येने पतसंस्थेचे शिक्षक सभासद सहभागी झाले होते.

वेंगुर्ला शिक्षक पतसंस्थेमध्ये झालेल्या अपहरला वाचा फ़ोढून मालक सभासदांना न्याय मिळावा. तसेच झालेल्या अपहाराची माहिती देण्यासाठी संचालक मंडळाने विशेष सभेचे आयोजन करावे. अशी मागणी केली होती. याची दाखल घेत आज जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था माणिक सांगळे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षांना लेखी पत्राद्वारे सभासदांच्या मागणीनुसार सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे अशी निर्देश दिले आहेत याबाबतचे पत्र आंदोलन करत असलेल्या शिक्षक पतपेढीच्या मालक सभासदांना दिल्याने गेले दोन दिवस विशेष सर्वसाधारण सभेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलन आज दुपारनंतर स्थगित केले आहे.

error: Content is protected !!