सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे सदस्य नोंदणीचे अर्ज उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्याजवळ आज जमा करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालकांनी लवकरात लवकर आपले अर्ज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग या ठिकाणी जमा करावेत. नोंदणी अर्जासोबत ऑटो रिक्षा परवाना, चालक अनुप्राप्ती (लायसन), बॅच, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी छायांकित करून सोबत जोडण्यात यावी. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी केले आहे .फक्त अर्ज जमा करावेत. नोंदणी शुल्क नंतर भरणा करावी. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग या ठिकाणी नोंदणी अर्ज जमा करतेवेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कुडाळ तालुकाध्यक्ष रवी माने, कार्याध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन संघटनेचे सचिव सुनील पातडे उपस्थित होते.